नाशिक : कोडीपाडा येथे युवकावर बिबट्याचा हल्ला, पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी

सुरगाणा; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव शिवारातील कोडीपाडा राक्षसभुवन रोडवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना रविवारी (दि. १०) रात्री आठच्या सुमारास घडली.

प्रमोद हंसराज महाले (दि. १६, रा. कोडीपाडा) असे या जखमी युवकाचे नाव आहे. तो ठाणगाव येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयात दहावीत शिकत आहे. प्रल्हाद महाले शेतात गेला होता. तो रात्री आठ वाजता घरी परतत असताना शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. यामध्ये प्रल्हादच्या पायाला गंभीर जखमी झाली. सोमवारी (दि. ११) सकाळी बाऱ्हे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कवर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल माया म्हस्के, वनरक्षक सुशीला लोहार, लक्ष्मण घटका यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दिवसेंदिवस बाऱ्हे परिसरातील जंगलात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. त्यामुळे पिंजरा लावण्यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

The post नाशिक : कोडीपाडा येथे युवकावर बिबट्याचा हल्ला, पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी appeared first on पुढारी.