तालुक्यातील चोरट्यांवर तडीपारीची कारवाई करावी; नागरिकांची मागणी

सुरगाणा, www.pudhari.news

सुरगाणा (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा; सुरगाणा शहरासह तालुका परिसरात मोबाईल, मोटरसायकल, दागिने यांसारख्या विविध प्रकारच्या चोऱ्या करणाऱ्या युवकांवर आणि त्याच्या साथीदारांवर कायदेशीर तडीपारीची कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सुरगाणा शहरासह तालुका परिसरात मोबाईल, मोटरसायकल, पेट्रोल, घरातून ऐवज लंपास करणे यासारख्या चोऱ्या सातत्याने घडत आहेत. बाहेरून येणारे व मोलमजुरी करणारे महिला व पुरुष यांचे देखील मोबाईल हातोहात लंपास केले जात आहेत. यामध्ये येथील कमलाकर दत्ता पवार व त्याच्या साथीदारांच्या नावाची चर्चा होत असते. मोबाईल चोरीसह इतर चोऱ्यांचा प्रकार देखील सातत्याने घडत आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून कमलेश व त्याच्या साथीदारांवर कायदेशीर तडीपारीची कारवाई करण्याची मागणी पोलिस निरीक्षक संदिप कोळी यांना नागरिकांच्या सह्या असलेले लेखी निवेदन देऊन करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post तालुक्यातील चोरट्यांवर तडीपारीची कारवाई करावी; नागरिकांची मागणी appeared first on पुढारी.