Nashik leopard attack : बिबट्याशी झुंज देत विद्यार्थ्याने वाचविले मित्रांचे प्राण

इगतपुरी बिबट्या pudhari.news

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील धार्णोली येथे बिबट्याने विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची थरारक घटना समोर आली आहे. योगेश रामचंद्र पथवे हा दहावीत शिकणारा विद्यार्थी त्याचे तीन मित्र प्रवीण, नीलेश, सुरेश यांच्यासह शनिवारी सकाळच्या सुमारास घरातून शाळेच्या दिशेने जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. योगेशने प्रसंगावधान राखत मित्रांना बाजूला ढकलून देत बिबट्याशी झुंज देत त्याचा हल्ला परतवून लावला. मात्र, यात तो जखमी झाला.

यावेळी वारंवार प्रतिकार केल्याने व मित्रांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. जखमी योगेशला मित्रांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. सामाजिक कार्यकर्ते सीताराम गावंडा यांनी परिसरात पिंजरा लावण्याची व जखमी विद्यार्थ्यास शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली. योगेशच्या या थरारक कामगिरीबद्दल तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

हेही वाचा:

The post Nashik leopard attack : बिबट्याशी झुंज देत विद्यार्थ्याने वाचविले मित्रांचे प्राण appeared first on पुढारी.