नगरसूलला रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू

रेल्वेतून पडून मृत्यू www.pudhari.news

नगरसुल (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- नगरसुल-छत्रपती संभाजीनगर रेल्वे लाईनवर सोमवारी रात्री रेल्वेतून पडल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. राजेश रेवाराम (४६, खरगोन, मध्य प्रदेश) असे मयताचे नाव आहे. मंगळवारी (दि.२६) सकाळी ट्रॅकमन कर्मचारी ग्रस्त घालत असताना नगरसूलपासून पूर्वेला दोन किमी अंतरावर मृतदेह निदर्शनास आला. येवला तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृताच्या खिशात आधारकार्ड, फोन डायरी मिळून आली. त्यावर संपर्क साधल्यानंतर त्याची ओळख पटली. येवला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

हेही वाचा :

The post नगरसूलला रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.