
दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील जानोरी परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत असल्याने या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे कुत्रे बिबट्याने फस्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असल्यामुळे जानोरी ग्रामपंचायतने वन विभागाला पत्र देऊन पिंजरा लावण्याची मागणी केली होती. या मागणीवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जानोरी येथील रेवचंद वाघ यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला आहे.
जानोरी येथील आडगाव रस्ता शिवारातील सुभाष घुमरे यांच्या मळ्यातील बिबट्याने दोन ते तीन कुत्रे फस्त केले. त्यानंतर जानोरी येथील शेतकरी रेवचंद वाघ यांच्यासमोर बिबट्याने त्यांचे कुत्रे खाल्याने जानोरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे जानेवारी ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष नेहेरे, उपसरपंच हर्षल काठे व ग्रामपंचायत सदस्य यांनी वन विभागाला ग्रामपंचायतीच्या वतीने पत्र देऊन जानोरी परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीवर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जानोरी येथील तंटामुक्ती अध्यक्ष रेवचन वाघ यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला असून यावेळी वन विभागाचे अधिकारी दळवी साहेब सरपंच सुभाष नेहरे ग्रामपंचायत सदस्य विलास काठे गणेश विधाते तंटामुक्ती अध्यक्ष रेवचंद वाघ, राजकुमार वाघ भारत काठे वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा :
- आमचा फॉर्म्युला ठरला आहे, योग्य वेळी जाहीर करू : देवेंद्र फडणवीस
- १७ वर्षाची देवनंदा ठरली देशातील सर्वांत कमी वयाची अवयवदाता; पित्याला दिले यकृत
- नगर : काम मंजूर एकीकडे, झाले दुसरीकडे..! मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामामध्ये सावळा गोंधळ
The post नाशिकच्या जानोरीत बिबट्याने फस्त केले अनेक शेतकऱ्यांचे कुत्रे appeared first on पुढारी.