नाशिक : आपला दवाखाना’चे अंबडला उद्घाटन

आपला दवाखाना उद्घाटन,www.pudhari.news

सिडको : पुढारी वृत्तसेवा

शहरातील पहिल्या आरोग्यवर्धिनी केंद्राचे रुपांतर हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये करून चुंचाळे घरकुल शिवार, अंबड येथे त्याची उभारणी करण्यात आली आहे. राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दवाखान्याचे दृकश्राव्य पद्धतीने लोकार्पण करण्यात आले.

यावेळी महापालिकेचे डॉ. नागरगोजे, माजी नगरसेवक राकेश दोंदे .सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील, रामदास दातीर, अरुण जाधव, कमळा पवार, अलका डावखुरे, राहुल दोंदे, अरुण दातीर, योगेश शिंदे, राहुल राऊत, शरीफ मंसुरी आदी  उपस्थित होते.  शहरी भागातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवण्यासाठी, सातत्यपूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी, विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी तसेच सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी व आरोग्य निर्देशांक वाढविण्यासाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची राज्यात स्थापना करण्यात आली आहे.

राज्यातील ३४२ तालुक्यात एक मे रोजी हे दवाखाने कार्यरत झाले आहेत. चुंचाळे घरकुल शिवार येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री दादा भुसे, आ. सिमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदींनी शुभेच्छा दिल्या.

मिळणाऱ्या सेवा 

बाह्य रुग्णसेवा (वेळ दुपारी २ ते रात्री १०), मोफत औषधोपचार,  मोफत तपासणी, टेली कन्सल्टेशन द्वारे तज्ञांचा सल्ला, गर्भवती मातांची तपासणी,  बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय,  महिन्यातून निश्चित केलेल्या दिवशी नेत्र तपासणी,  मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, गरजेनुसार विशषज्ञ सेवा.

हेही वाचा :

 

The post नाशिक : आपला दवाखाना'चे अंबडला उद्घाटन appeared first on पुढारी.