नाशिक : काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने हाती घेतला धनुष्यबाण

मनमाड www.pudhari.news

नाशिक (मनमाड) : रईस शेख 

आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मनमाडमध्ये राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसला ही सुरुंग लावले असून काँग्रेसचे माजी नगरसेवक मिलिंद उबाळे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांचीं (शिंदे गट) शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला आहे.

गेल्या 15 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनमाड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीसह इतर काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यानंतर आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सेनेत जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. मनमाडचे माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, नांदगावचे बाळकाका कलंत्री यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेसचे माजी नगरसेवक मिलींद उबाळे यांनीही शिंदे सेनेत उडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली असून मनमाड शहर कार्याध्यक्ष नाना शिंदे, बबलू पाटील यांच्या पाठोपाठ माजी नगरसेवक सादिक पठाण यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे मागील दहा वर्षात शहरात असलेले राष्ट्रवादीचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक मिलिंद उबाळे यांनी शेकडो कार्यकर्त्यासह आ.सुहास कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आ.कांदे यांनी सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एकंदरीतच मनमाडसह नांदगाव मतदार संघावर गेल्या 10 वर्षांपासून मजबूत पकड असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पकड  आता कमकुवत होत असल्याने पुढील काळात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत याचा परिणाम नक्कीच जाणवणार यात शंका नाही.

आमच्यावर विश्वास ठेऊन आपण शिवसेनेत प्रवेश घेतला आपल्या प्रत्येक सुखा दुःखात आम्ही आपल्या सोबत राहू, आपल्या प्रत्येक विकास कार्यात सहकार्य करू, आपण आजपासून एक कुटुंब आहोत. – सुहास कांदे, आमदार. 

हेही वाचा:

The post नाशिक : काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने हाती घेतला धनुष्यबाण appeared first on पुढारी.