नाशिक : कोकणासाठी उद्यापासून 26 विशेष रेल्वे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
मध्य रेल्वे कोकण विभागासाठी 26 उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. रेल्वेने या आधीच 916 उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. नवीन 26 गाड्यांचा तपशील 6 मे ते 3 जूनदरम्यान 01129 विशेष गाडी दर शनिवार, सोमवार, बुधवार मुंबईतील एलटीटीई येथून 22.15 वाजता सुटून कोकणातील थिवी येथे दुसर्‍या दिवशी 11.30 वाजता पोहोचेल. 01130 ही गाडी 7 मे ते 4 जूनपर्यंत दर रविवार, मंगळवार, गुरुवारी थिवी येथून 16.40 वाजता मुंबई एलटीटीईला रवाना होईल. ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड येथे या गाडीला थांबे आहेत. या दोन्ही गाड्यांसाठी 4 मपासून संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या आयआरसीटीस संकेतस्थळावर सुरू झाले.

हेही वाचा:

The post नाशिक : कोकणासाठी उद्यापासून 26 विशेष रेल्वे appeared first on पुढारी.