शरद पवार नाशिकमध्ये दाखल, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

शरद पवार

नाशिक : 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी आपली पहिली सभा छगन भुजबळ यांच्या मतदार संघ असलेल्या येवल्यात घेण्याचे ठरवले आहे. यासभेसाठी शरद पवार आज नाशिकमध्ये आले आहेत. नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी पवारांचे जंगी स्वागत केले आहे. पवार यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे व सुप्रिया सुळे देखील आहेत.

थोड्याच वेळात शरद पवार सभेसाठी येवल्याकडे रवाना होतील. तसेच थोड्याच वेळात छगन भुजबळ देखील नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. येवल्यात शरद पवार हे छगन भुजबळ यांचा समाचार घेणार असून छगन भुजबळ हे नाशिकमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात आज चांगलेच राजकीय घमासान पाहायला मिळणार आहे.

The post शरद पवार नाशिकमध्ये दाखल, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत appeared first on पुढारी.