नाशिकच्या एसव्हीकेटीला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्रदान

नाशिकरोड www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयास शुक्रवारी विद्यापीठाच्या प्रांगणात (दि. १०) भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

मराठा विद्या प्रसारक समाजाचे नाशिक ग्रामीणचे तालुका संचालक रमेश पिंगळे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कांतिभाई तेजुकाया व एसव्हीकेटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व मानपत्र असे होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नीती आयोग व उपसमितीचे सदस्य भिकूजी इदाते, प्र. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार , सुमेत्रा पवार, मधुकर पिचड आदी होते. सोहळ्याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. डी. टी. जाधव, सोपान एरंडे, श्याम जाधव, डॉ. सुनील सौंदाणकर, डॉ. शिवाजी आंधळे, कुलसचिव दिनेश कानडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिकच्या एसव्हीकेटीला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्रदान appeared first on पुढारी.