
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गंजमाळ येथील पंचशिल नगर परिसरात रविवारी (दि.५) सायंकाळी सहा वाजता तिघांनी मिळून महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात ईशा जुनेद शेख (रा. पंचशिल नगर) या गंभीर जखमी झाल्या आहेत. ईशा शेख यांच्या फिर्यादीनुसार, संशयित अंजुम खान, जरीन खान, नासिर शेख यांनी शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात ईशा या गंभीर जखमी झाल्या आहेत. ईशा यांनी घर खाली केले नाही याकारणावरून संशयितांनी मारहाण केल्याचे ईशा यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
The post नाशिक क्राईम : गंजमाळला महिलेवर प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.