नाशिक क्राईम : दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना केले तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील अंबड व उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाेघांना शहर पोलिसांनी तडीपार केले आहे. समाधान अशोक बोकड (२३, रा. सातपूर) व पंकज अशोक मोरे (२९, रा. आगरटाकळी, नाशिकरोड) अशी तडीपार केलेल्या दोघांची नावे आहेत.

या दोघांविरोधात अंबड व उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर दुखापत करणे, लूटमार, विनयभंग, जाळपोळ करणे असे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केल्याने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांनाही तडीपार करण्यात आले. शहर पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात १४ जणांना तडीपार केले आहे. तर चालू वर्षभरात परिमंडळ दोनमधील ४९ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, ९ तडीपार गुंडांना शहरातून ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक क्राईम : दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना केले तडीपार appeared first on पुढारी.