नाशिक : खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा

संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

‘हे सरकार तीन महिन्यात जाणार, मरण अटळ आहे. बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका तुम्ही अडचणीत याल’, असे वक्तव्य पत्रकार परिषदेत केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खा. राऊत हे शुक्रवारी (दि.१२) नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी सार्वजनिक आगळीक होण्यासारखे व पोलिसांची प्रतिमा मलीन होईल असे विधान केले. त्यामुळे पोलिसांनी खा. राऊत यांच्याविरोधात सार्वजनिक आगळीक होण्यास साधक विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.