नाशिक : गोंदे टोलनाका फोडणाऱ्या सात मनसैनिकांना अटक

गोंदे टोल नाक्‍यावर मनसेचे खळखट्याक

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

अमित ठाकरे यांचा ताफा अडवला म्हणून, नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गावरील गोंदे टोलनाका रविवारी पहाटे मनसैनिकांनी फोडला. याप्रकरणी वावी पोलिसांनी रात्री पावणे बाराच्या सुमारास सात जणांना अटक केली आहे.

त्यात शुभम सिद्धार्थ थोरात (27, रा. दत्त चौक सिडको, नाशिक), शैलेश नारायण शेलार (31, रा. खेरवाडी ता. निफाड), बाजीराव बाळासाहेब मते (30, रा. देवळाली, नाशिक), ललित नरेश वाघ (28, रा. पवन नगर नाशिक), शशिकांत शालिग्राम चौधरी (36, रा. जेलरोड, नाशिक रोड, नाशिक), प्रतीक माधव राजगुरू (23, रा. सावता नगर सिडको, नाशिक) स्वप्निल संजय पाटोळे (28, रा. अभियंता नगर, कामटवाडा, नाशिक) यांचा समावेश आहे.

टोलनाका तोडफोड प्रकरणात आणखी काही तरुणांचा समावेश आहे किंवा काय याबाबत वावी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : गोंदे टोलनाका फोडणाऱ्या सात मनसैनिकांना अटक appeared first on पुढारी.