
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शिवसेना नाशिकच्या वतीने रविवारी (दि.14) जुने नाशिक येथील संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. शिवसेना उपमहानगर प्रमुख उमेश चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थित पदाधिकारी-नाशिक युवासेना विस्तारक योगेश बेलदार, जुने नाशिक शिवजन्मोत्सवसमितीचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, शिवसेना विधानसभा प्रमुख रोशन शिंदे, उपजिल्हाप्रमुख अमोल सूर्यवंशी, प्रमोद लासुरे, उपमहानगरप्रमुख अक्षय कलंत्री, आनंद फरताळे, नितीन लासुरे, युवा सेना विधानसभा प्रमुख आकाश कोकाटे, मनोज कोते, नितीन कोळपकर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा:
- नाशिक : वणी शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी
- परभणी : गटसाधन केंद्रात छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा विसर; संभाजी ब्रिगेडची कार्यवाही करण्याची मागणी
- Cyclone Mocha Update: ‘मोचा’ बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकले, काही भागात प्रचंड नुकसान
The post नाशिक : जुने नाशिकमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी appeared first on पुढारी.