सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड,www.puddhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– केंद्र सरकारच्या बहुप्रतिक्षित सूरत- चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी नाशिक तालुक्यातील ३ गावांमधील ४० हेक्टरचे भुसंपादनास शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. त्यामुळे प्रकल्पाचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.

नाशिक तालुक्यातील भुसंपादनासंदर्भात शुक्रवारी (दि.१९) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीला आमदार सरोज अहिरे व अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्यासह अन्य अधिकारी व बाधित गावांमधील शेतकरी बैठकीसाठी उपस्थित होते.

महामार्गासाठी ओढा, लाखलगाव व विंचुर गवळी या तीन गावांमधील ३६ शेतकऱ्यांनी मुल्यांकना बाबत तक्रार केली होती. या तक्रारीत जुन्या झाडांचे मुल्यांकन, विहिर, पाईपलाईन याचे मुल्यांकन कमी झाल्याचे म्हटले होते. यासर्व प्रश्नांवर प्रशासनाकडून मार्ग काढण्यात आला आहे. दरम्यान, सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड हा नाशिक जिल्ह्यातील ६ तालूके व ७० गावांमधून जाणार आहे. जिल्ह्यात १२२ किलोमीटर महामार्गाचे अंतर आहे. सुरगाण्याच्या राक्षसभवन येथे हा सहापदरी महामार्ग सुरू होणार असून सिन्नर तालूक्यातील वावी आसपास जिल्ह्यातील शेवटचे टोक असणार आहे. या प्रकल्पासाठी नाशिक तालुक्यातील ओढा, लाखलगाव व विंचुरगवळी या तीन गावांतील सुमारे ४० क्क्टर क्षेत्र संपादीत केले जाणार आहे. आजच्या बैठकीत नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांचे समाधान झाल्याची माहिती आ. अहिरे यांनी दिली.

हेही वाचा :

The post नाशिक तालुक्यातील भुसंपादनाचा मार्ग सुकर appeared first on पुढारी.