नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेनंतर हिंदूची बदनामी सुरु – नितेश राणे

आ. नितेश राणे www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क

त्र्यंबकेश्वरमधील शांतता भंग करण्याचा आमचा हेतू नाही. त्र्यंबकेश्वर येथील 13 मे च्या घटनेनंतर हिंदूची बदनामी सुरु असून येथील प्रवेशव्दाराजवळ धूप लावण्याची प्रथा देखील नाही. उरूस बाहेरच्या परिसरातून निघतो. जिहादी विचारांच्या लोकांकडून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगितले. ते मंगळवारी (दि.23) त्र्यंबकेश्वर मंदिराची पाहणी करण्यासाठी नाशिकला दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकांराशी संवाद साधला.

त्र्यंबकेश्वर मंदिरात आरती केली. धर्मामध्ये आरती करणं, आमची जबाबदारी आहे. हक्क आहे. धर्मावर होणारे अन्याय आम्ही थांबवू शकले नाही तर आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी महाआरती केली. येथे येणाऱ्यांच्या संख्येपेक्षा भावना महत्त्वाची आहे. हे आक्रमण हिंदू धर्माच्या विरोधात होत आहे. जे काही हल्ले आमच्या हिंदू धर्मावरती होत आहे ते थांबवण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत. – नितेश राणे, आमदार.

The post नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेनंतर हिंदूची बदनामी सुरु - नितेश राणे appeared first on पुढारी.