नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरातील ‘त्या’ घटनेवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ; म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक ; पुढारी ऑनलाइन डेस्क 

त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याची कथित घटना काल घडली होती. त्यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील सोशलमीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या घटनेची एसआयटी चौकशी करण्यात यावी असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या नंतर आता  या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कायदा व सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पण लोकांनीही सहकार्य केले पाहिजे. प्रत्येक समाजातील लोकांनी पुढे येऊन शांतता राखली पाहिजे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर व्यक्त केले आहे. राज्यात सर्वजातीपातीची लोक राहतात. कायदा व सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. मात्र त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावं. कोठेही जातीय तणाव निर्माण होणार नाही, कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही यासाठी सगळ्या समाजातील लोकांनी काळजी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ही एसआयटी यावर्षीच्या घटनेसह गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरातील 'त्या' घटनेवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ; म्हणाले... appeared first on पुढारी.