नाशिक : दीड एकर जागा बळकविण्याचा बिल्डरचा होता डाव, ‘असा’ उधळला…

अतिक्रमण जमीनदोस्त,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

प्रभाग क्रमांक ३१ मध्ये महापालिकेच्या क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर बिल्डरने वॉल कम्पाउंडसाठी सुमारे दीड ते दोन एकर जागेवर केलेले अतिक्रमण मनपा अतिक्रमण विभागाने बुधवारी सकाळी जमीनदोस्त केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रभाग क्रमांक ३१ मध्ये सर्व्हे नंबर ८९०/२३/१ मध्ये १०५०१ आर चौरसमीटर, अडीच एकर जागा ही क्रीडांगणासाठी आरक्षित आहे. या भूखंडालगत एका बिल्डरचा भूखंड आहे. मनपाच्या भूखंडावर या खासगी बिल्डरने चक्क २३ फूट रुंद तसेच १०० मीटर लांब वॉल कम्पाउंड बांधण्याचे काम सुरू केले होते. याबाबतची माहिती माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे यांना जागरूक नागरिकांनी लक्षात आणून देताच त्यांनी १४ जून २०२२ ला मनपाशी पत्रव्यवहार करत अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती.

बिल्डरकडून वॉल कम्पाउंडचे काम पुन्हा वेगाने सुरू करताच बडोदेंनी पुन्हा महापालिकेकडे तक्रार केली होती. त्यानंतर मनपाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात जागेचे मोजमाप करत अनधिकृत काम बंद पाडले होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना बडोदे यांनी केलेला पत्रव्यवहाराचे पत्र मनपा आयुक्तांकडे आले. त्यानंतर मनपा अतिक्रमण विभागाने बुधवारी सकाळी अतिक्रमण जमीनदोस्त केले.

हेही वाचा :

The post नाशिक : दीड एकर जागा बळकविण्याचा बिल्डरचा होता डाव, 'असा' उधळला... appeared first on पुढारी.