नाशिक: दुचाकीच्या धडकेत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी ठार

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : येथील पिंपळनेर सटाणा रस्त्यावर भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात बल्हाणे येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बापू रामचंद्र बिरारी यांचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.११) दुपारी घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, बापू बिरारी दुचाकीवरून (एमएच ०५ बीपी १९०६) पिंपळनेर येथील एकविरानगर येथे त्यांच्या घराकडे जात होते. त्यादरम्यान अचानक समोरून वेगाने येणाऱ्या दुचाकीने (एमएच १८एक्स ४११२) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात बापू बिरारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे येथे नेत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. पिंपळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

अपघातानंतर धडक देणारा दुचाकीस्वार गाडी सोडून पळून गेला. पिंपळनेर पोलिसांत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू बिरारी येथील डॉ. पंकज पाटील यांचे वडील होत.

हेही वाचा 

The post नाशिक: दुचाकीच्या धडकेत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी ठार appeared first on पुढारी.