नाशिक : नात्याची वीण घट्ट करणारे रक्षाबंधन साजरे

रक्षाबंधन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लहानपणी सतत कुरबुर करणारे, छोट्या-छोट्या गोष्टीवरून घरात रुसवे फुगवे करणारे पण…. त्यानंतर शिक्षण, नोकरीनिमित्ताने लांब राहण्याची वेळ आल्यावर भावाचे आणि बहिणीचे महत्त्व समजणारा सण म्हणजे रक्षाबंधन.. भाऊ-बहिणीच्या नात्याची वीण घट्ट करणारे रक्षाबंधन जुन्या आठवणींना उजाळा देत साजरा करण्यात आले.

राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्रा काल आल्याने अनेकांमध्ये राखी कोणत्या वेळेत बांधावी याबाबत संभ्रम निर्माण झाला होता, परंतु रक्षाबंधन हा भावा-बहिणीचा पवित्र सण असल्याने दिवसभरात कोणत्याही वेळी राखी बांधता येईल, असे पंचागकर्त्यांनी सांगितले होते. यंदा राखींच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याने राखीला महागाईची झळ तर बसलीच पण शासनाने अमृत महोत्सवानिमित्त महिलांसाठी तिकीट दरात खास ५० टक्के सूट दिल्याने एसटी बसला तुफान गर्दी झाली होती. माहेरवाशिणींची भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जाण्याची हुरहुर, तर भावंडांनी बहिणीला भेटवस्तू खरेदी करण्यासाठी लगबग बघायला मिळाली. त्याचबरोबर भावा-बहिणीची आवड जपत आवडती मिठाई घेण्यासाठी मिठायांच्या दुकानात गर्दी झाली होती.

अॅानलाइनचा सहज सोपा पर्याय….

इतर राज्यात, परदेशात एकमेकांपासून कोसो दूर राहणाऱ्या भावा-बहिणींसाठी अॅानलाइनचा सहज सोपा पर्याय उपलब्ध असल्याने भावाला बहिणींनी आवडती राखी आॅनलाइन पाठविणे पसंत केले. अॅानलाइन शॉपिंग साइट्सवर विविध प्रकारच्या राख्या भेटवस्तूंसह उपलब्ध असल्याने अॅानलाइन शॉपिंगवर साइट्सवर आकर्षक सवलती देण्यात आल्या होत्या.

हेही वाचा :

The post नाशिक : नात्याची वीण घट्ट करणारे रक्षाबंधन साजरे appeared first on पुढारी.