
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत येत्या ३० तारखेला मतदान होणार आहे. मतदानावेळी मतदारांना त्यांच्या मतदार कार्डासह अन्य १० कागदपत्रेही ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.
हे पुरावे असणार ग्राह्य
आयोगाने ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरलेल्या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), केंद्र / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / खासगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, खासदार / आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना वितरित केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र तसेच केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरित केलेले युनिक डिसॅबिलिटी ओळखपत्र इत्यादींचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे.
हेही वाचा :
- Supriya Sule vs Chitra Wagh : पक्षातील खदखद पार चव्हाट्यावर, पक्षाची काळजी घ्या; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळे यांना पलटवार
- पुणे : नियोजन समिती सदस्यांच्या बैठक व्यवस्थेचा पेच; जिल्हा प्रशासनापुढे प्रश्न
- सातारा : पंक्चर काढत असताना पिकअपला ट्रकने ठोकरले; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
The post नाशिक पदवीधर निवडणूक : मतदानासाठी ही '१०' कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य appeared first on पुढारी.