नाशिक : पिंपळस बॅक वॉटर परिसरात सेल्फीच्या नादात पर्यटनासाठी आलेली महिला बुडाली

drawned

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : पर्यटनासाठी वाडिवऱ्हे परिसरात आलेली महिला सेल्फी काढताना पाण्यात बेपत्ता झाली आहे. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळस बॅक वॉटर परिसरात दीपिका सोनार (31, पाथर्डी फाटा) या पाण्यात बेपत्ता झाल्या आहेत.

दीपिका यश सोनार (३१, रा.-पाथर्डी फाटा) या शीला शिंदे, शितल पाटील (तिघे रा. पाथर्डी फाटा), अमोल कदम (रा. पपया नर्सरी त्रंबक रोड) असे चौघे वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळस येथे आले होते. पाण्यात सेल्फी काढताना चौघेही बुडाले. त्यापैकी तिघे पाण्याबाहेर आले तर दीपिका या बेपत्ता झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळतात नाशिक तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. मात्र रात्री उशिरापर्यंत दीपिका यांचा शोध लागला नाही.

The post नाशिक : पिंपळस बॅक वॉटर परिसरात सेल्फीच्या नादात पर्यटनासाठी आलेली महिला बुडाली appeared first on पुढारी.