नाशिक : पूर्वनियोजित कट रचून ११ जणांनी एकाच्या शेतातील गव्हाचे पीक जाळलं

गव्हाचे पीक जाळले,www.pudhari.news

नाशिक : पूर्वनियोजित कट रचून ११ जणांनी एकाच्या शेतातील गव्हाचे पीक जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात तीन महिलांसह ११ जणांविराेधात जाळपोळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप पोपट रोकडे (३६, रा. नानेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयितांनी १ जून २०२२ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास नानेगाव येथील शेतातील गव्हाचे पीक जाळून नुकसान केले. या प्रकरणी फशाबाई अशोक रोकडे, अशोक बाबूराव रोकडे, संजय नाना रोकडे, सोमनाथ नाना रोकडे, सुनील केरू रोकडे, योगेश अशोक रोकडे, भानुदास अशोक रोकडे, नामदेव अशोक रोकडे, योगीता सोमनाथ रोकडे, सविता भानुदास रोकडे (सर्व रा. नानेगाव), शरद फकिरा कासार (रा. शेवगे दारणा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : पूर्वनियोजित कट रचून ११ जणांनी एकाच्या शेतातील गव्हाचे पीक जाळलं appeared first on पुढारी.