Nashik 11th Admission : तिसऱ्या यादीत ३,७८१ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट

अकरावी प्रवेश प्रक्रिया www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी केंद्रिभूत पद्धतीने ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत असून, बुधवारी (दि. १३) तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत ३ हजार ७८१ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट दिली आहे. या विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि.१४)पर्यंत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. त्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील विविध ६५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीच्या २७ हजार २४० जागा उपलब्ध आहेत. पहिल्या गुणवत्ता यादीतील ८ हजार १४१, तर दुसऱ्या गुणवत्ता यादीत २ हजार ६८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. तिसऱ्या यादीसाठी १६ हजार ४१४ जागा उपलब्ध होत्या. या फेरीसाठी ३ हजार ७८१ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. त्यामध्ये विज्ञान शाखेचे सर्वाधिक २ हजार ११५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ वाणिज्य शाखेच्या १ हजार २३, कला शाखेच्या ५५७, तर एमसीव्हीसी या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ८५ विद्यार्थ्यांना या यादीत स्थान मिळाले आहे.

तिसऱ्या यादीत राज्य शिक्षण मंडळाच्या ३ हजार ५३४, सीबीएसई बोर्डाच्या १५७, तर इतर ९० विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. १ हजार ८४७ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे, ७६६ विद्यार्थ्यांना द्वितीय पसंतीचे, तर ४७५ विद्यार्थ्यांना तृतीय पसंतीचे महाविद्यालय मिळाले. या यादीत इडब्लूएस प्रवर्गातील सर्वाधिक १ हजार ८१५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्याखालोखाल ओबीसी (७५२), अनुसूचित जाती (५२१), अनुसूचित जमाती (३४०) या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाले आहे.

महाविद्यालयनिहाय कटऑफ

महाविद्यालय-कला-वाणिज्य-विज्ञान

एचपीटी-आरवायके-३६५-००-४०९

बीवायके-००-३६१-३८२

बॉइज टाऊन-००-३६६-४९५

केटीएचएम-३५९-३७३-३८३

केव्हीएन नाईक-३२९-३३७-३८६

पंचवटी-३५२-४२२-३५७

नाशिकरोड बिटको-३२२-३३६-३३७

सिडको महाविद्यालय-२९१-३२९-३७५

हेही वाचा : 

The post Nashik 11th Admission : तिसऱ्या यादीत ३,७८१ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट appeared first on पुढारी.