
नाशिक (नाशिकरोड) : पुढारी वृत्तसेवा
येथील प्रसिद्ध उद्योगपती आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकिसन काशिनाथ कलंत्री (91) यांचे गुरुवार, दि.25 सकाळी निधन झाले. नाशिकरोड येथील रामनाथ जगन्नाथ कलंत्री आणि कंपनीचे ते संचालक होते. ही कंपनी त्यांनी सुरूवातीच्या काळात छोट्या स्वरूपात सुरू केली होती. पुढे त्यांनी मेहनत घेऊन या कंपनीचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर केले. शिवाय त्यांनी इतर व्यवसायातही यशस्वी पदार्पण केले. ज्येष्ठ नेते स्व. माधवराव पाटील व रामकिसन कलंत्री हे उपनगर येथील इच्छामणी मंदिराचे संस्थापक होत. त्यांच्या पश्चात पत्नी, अमर हा मुलगा, पाच मुली, जावई, सून, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. तर शुक्रवार (दि. 26) रोजी सायं. 5 वा. माहेश्वरी भवन येथे त्यांची उठावणा होणार आहे. तसेच श्रद्धांजली बैठक शनिवार व रविवार रोजी सायं. 5 ते 7 या वेळेमध्ये कलंत्री निवास, नाशिकरोड येथे होईल. गुंज फाऊंडेशन या संस्थेचे अध्यक्ष अमर कलंत्री यांचे ते वडील होत.
हेही वाचा:
- पळसदेव : पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांचा उजनीकाठी मुक्काम
- विकृतीचा कळस : ५० वर्षीय नाराधमाचा ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
- कर्नाटकमधील हिजाब बंदी काँग्रेस हटवणार?, मंत्री खर्गेंनी दिले संकेत
The post नाशिक : प्रसिध्द उद्योगपती रामकिसन कलंत्री यांचे निधन appeared first on पुढारी.