नाशिक : भिंत कोसळून दबली तीन मुले

husainiya mashid www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील हुसैनिया मशिदीजवळील खुल्या भूखंडाभोवतीची भिंत कोसळल्याने जवळच खेळणारी तीन मुले त्याखाली दबली गेली. अग्निशमन दल, पोलिस आणि नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केल्याने तिघांचे प्राण वाचविण्यात यश आले.

जैनुद्दीन कॉम्रेड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 9) दुपारी मुजाहिद्दीन आझादी संस्थेच्या भिंतीजवळ मोकळ्या जागेवर काही मुले खेळत होती. तेव्हा त्यांच्यावर अचानक संरक्षक भिंत कोसळली. लोकांनी तत्काळ धाव घेत अग्निशमन दल आणि पोलिसांना खबर देण्यात आली. ढिगारा बाजूला करून तीन मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर नसल्याचे सांगितले. जखमींमध्ये मोआज, मुनीब आणि मुसद्दीक या 10 ते 12 वयाच्या मुलांचा समावेश आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : भिंत कोसळून दबली तीन मुले appeared first on पुढारी.