नाशिक : वणी शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी

vani www.pudhari.news

नाशिक (वणी)  : पुढारी वृत्तसेवा
वणी येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रविवार (दि.१४) रोजी वणी येथे  शिव-शंभु जन्मोत्सव समितीच्यावतीने जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

महापुरूषांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी वणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे, डाॅ. दीपक देशमुख, आबासाहेब देशमुख, प्रकाश कड, माजी जिल्हा परिषद सदस्य छाया गोतरणे व मिना पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते शिवश्री हर्षल बागल यांना समितीच्या वतीने शिव-शंभु प्रबोधन पुरस्कार व सन्मानपत्र सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, अमोल बागुल, निलेश बोडखे भुषण देशमुख, महेंद्र बोरा, महेंद्र पारख, संदिप तुपलोंढे, राकेश थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

व्यासपीठावर मान्यवर प्रमुख उपस्थित असलेले अमोल बागुल यांनी संभाजी महाराज यांच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकला. देवयानी देशमुख, माजी उपसरपंच निलोफर मनियार यांनी मनोगत व्यक्त केले. टायटॅनिक जहाज बुडाले परंतु या दोघांच्या काळातील आरमाराची एक ही जहाज बुडाल्याची इतिहासात नोंद नाही. त्यावेळी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले होते. हा इतिहास सांगीतला जात नाही. तर इतिहास सर्वापर्यंत पोहचला पाहीजे. तर शहरात सायंकाळी ढोल ताश्याच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली.  चौकाचौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमा व जयंती शुभेच्छा असलेल्या होर्डिंग्ज लावण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य राहूल गांगुर्डे, जगन वाघ, उज्वला धुम, अनिता बागुल, रंजना पाडवी विमल बागुल व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिव-शंभो जन्मोत्सव समितीच्या वतीने परिश्रम घेण्यात आले.

हेही वाचा:

The post नाशिक : वणी शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी appeared first on पुढारी.