नाशिक : शहरात उद्या शिक्षक दरबार

शिक्षक

सिडको : पुढारी वृत्तसेवा

शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता सीएमसीएस कॉलेज, आकाशवाणी केंद्राजवळ, गंगापूर रोड, नाशिक येथे शिक्षक दरबारचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रवीण पाटील, वेतन पथक अधीक्षक उदय देवरे, लेखाधिकारी खडसे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक सुधीर पगार यांच्यासह शिक्षण खात्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरबारामध्ये नाशिक विभागातील प्रयोगशाळा सहायकांना इतर विभागाप्रमाणे वेतनश्रेणी, शिक्षणाधिकारी कार्यालयातील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मान्यता लवकरात लवकर देणे, शिक्षणसेवकांना नियमित वेतनश्रेणीतील मान्यता तसेच एटीडी टू एएम वेतनश्रेणी आणि डीएड ते बीएड वेतन श्रेणी मान्यता लवकरात लवकर देणे अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : शहरात उद्या शिक्षक दरबार appeared first on पुढारी.