Dhule Crime : पत्नीचा खून करुन पतीने केले विषप्राशन

गळा चिरुन खून,www.pudhari.news

धुळे, पिंपळनेर पुढारी वृत्तसेवा

शहरातील गवळीवाडा येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा धारदार चाकूने खून केल्याची खळबळजनक घटना काल रात्री घडली. या घटनेनंतर पतीने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

यासंदर्भात मुलगी नंदीनी पुरुषोत्तम मोरे (वय १६) रा.गवळीवाडा साक्री हिने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवार दि.५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मी व माझी आई किरण पुरुषोत्तम मोरे साक्री येथील सुंदर मॉलमधून घरी परतत होतो. यावेळी वडील पुरुषोत्तम नामदेव मोरे यांनी आमचा पाठलाग करुन बळजबरीने राहत्या घरात आले. मी घराच्या ओट्यावर बाहेर उभी असताना त्यांनी घरात माझ्या आईशी वाद घातला. तसेच तिच्या गळ्यावर घरातील धारदार चाकूने वार करुन ठार मारले. या फिर्यादीवरुन पुरुषोत्तम नामदेव मोरे (वय ४५) ह.मु. गवळीवाडा,ता.साक्री मुळ रा. उभंड वर्धाने ता.साक्री याच्याविरुध्द भादंवि कलम क ३०२,५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल करतेवेळी नंदीनी हिच्यासोबत मावसभाऊ सागर इंदवे रा.दिघावे व इतर नातेवाईकही पोलीस ठाण्यात उपस्थित होते. दरम्यान, पत्नीला ठार मारल्यानंतर पती पुरुषोत्तम मोरे याने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, पीआय आर.एन.देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक बी.बी.नऱ्हे यांनी घटस्थळी भेट देवून पहाणी केली. पुढील तपास बी. बी.नन्हे करीत आहेत.

हेही वाचा :

The post Dhule Crime : पत्नीचा खून करुन पतीने केले विषप्राशन appeared first on पुढारी.