नाशिक : सिडकोत एक लाख रुपये किमतीचा भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त

सिडको, पुढारी वृत्तसेवा : अन्न व औषध प्रशासनाने सिडकोत एका डेअरीवर छापा टाकून एक लाख पाच हजार रुपये किमतीचे ४३७ किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त केला आहे. शहरात बनावट पनीर व भेसळयुक्त पनीर विक्री होत असल्याची गुप्त माहिती प्रशासनास मिळाली असता त्यानुषंगे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने १८ जुलै रोजी आशीर्वाद डेअरी साईबाबा नगर महाकाली चौक, सिडको, या ठिकाणी तपासणी केली असता अस्वच्छ वातावरणात पनीरचा साठा साठवल्याचे निदर्शनास आले.

सदर पनीरचा भेसळीच्या संशयावरून अन्न नमुना विश्लेषनासाठी घेउन उर्वरीत ४३७ किलो ग्रॅ. किंमत रुपये १०८४४० चा साठा जप्त करण्यात करण्यात आला. सदरची मोहिम ही या पुढे ही सुरु राहणार आहे. अन्न व्यवसाईकांनी अन्न पदार्थात भेसळ करू नये. भेसळ करताना आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हेही वाचंलत का?

The post नाशिक : सिडकोत एक लाख रुपये किमतीचा भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त appeared first on पुढारी.