Nashik : आफताबसह हर्षल मोरेला फाशी द्या, नाशकात मुस्लीम समाजातर्फे बॅनरबाजी

नाशिक बॅनरबाजी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशभरात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना त्वरित फाशी देण्याची मागणी करणारा बॅनर शालिमार चौकात लावण्यात आला आहे. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आफताबच्या विरोधात संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना नाशिकमध्येही त्याचे पडसाद उमटत आहेत.

मुस्लीम समाजबांधवांतर्फे लावण्यात आलेल्या बॅनरवर केलेल्या दाव्यानुसार, देशात महिलांवर बलात्कार करणाऱ्यांना त्वरित फाशी द्या. आफताब पुनावाला, हर्षल बाळकृष्ण मोरे यांच्यासह इतर नराधमांना फाशी द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. हिंदू समाजातर्फे आज बी. डी. भालेकर मैदानावरून मूक मोर्चा काढण्यात आला. नाशिककरांनी मूक मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. संपूर्ण शहरात हिंदू समाजातर्फे बॅनर लावण्यात आले होते. याचवेळी शालिमार चौकातही मुस्लीम बांधवांमार्फतही बॅनरद्वारे फाशीची मागणी करण्यात आली.

The post Nashik : आफताबसह हर्षल मोरेला फाशी द्या, नाशकात मुस्लीम समाजातर्फे बॅनरबाजी appeared first on पुढारी.