पिंपळनेरला आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा

पिंपळनेर www.pudhari.news

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
कर्म.आ.मा.पाटील कला वाणिज्य आणि कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत बुधवार, दि. 8 रोजी आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य के. डी. कदम होते. प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्राध्यापक प्रदीप सावळे उपस्थित होते. महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक के. एन. विसपुते यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य व उपस्थित मान्यवर, विद्यार्थिनी प्रतिनिधी वैष्णवी दुसाने व सानिया शेख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. प्रा. चंद्रकांत घरटे यांनी सूत्रसंचालन केले व आभा मानले. याप्रसंगी प्राध्यापक डॉ. आनंद खरात, डॉ संजय खोडके, प्रा उगलमुगले व शिक्षकेतर कर्मचारी मनोहर बोरसे व विद्यार्थिनी स्वयंसेवक उपस्थित होते.

हेही वाचा:

The post पिंपळनेरला आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा appeared first on पुढारी.