Nashik : पेठ महामार्गावर कंटेनरची ट्रकला जोरदार धडक, वाहनचालक जखमी

accident

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा 

गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक पेठ महामार्गावरील उमराळे बुद्रुक चौफुली नजीक नाशिककडून येणा-या कंटेनरवरील ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने कंटेनर व ट्रकचा भीषण अपघात झाला.  कंटेनर पाण्याच्या उंच गटारीवर येऊन अडकल्याने पुढील जीवितहानी टळली.  मात्र कंटेनर वरील चालकाचे पाय दबल्याने तो गंभीर जखमी असून त्याला नाशिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

अधिक माहितीनुसार, नाशिक कडून येणाऱ्या कंटेनर क्रमांक (NL.01.A.7841) ने पेठ कडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकला मागून जोरदार धडक दिली. यावेळी रस्त्यात असणारा वीजेचा पोल थोडक्यात वाचला. कंटेनर पाण्याच्या उंच गटारीवर येऊन आदळला, गटार उंच असल्याने कंटेनर जागीच थांबला. त्यामुळे रस्त्यासमोरील गाळे बचावले.

नाशिक पेठ महामार्गावरील चौफुलीवर आतापर्यंत सात ते आठ अपघात झाले आहेत. या ठिकाणी दोन गतिरोधक बसविण्यात यावी अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.

हेही वाचा :

The post Nashik : पेठ महामार्गावर कंटेनरची ट्रकला जोरदार धडक, वाहनचालक जखमी appeared first on पुढारी.