पिंपळनेर : आंतरराष्ट्रीय “निरंकारी संत समागम”; भक्तांचा पहिला जत्था रवाना

निरंकारी संतसमागम www.pudhari.news

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
पिंपळनेर शाखामधील निरंकारी संत समागम भक्तांचा पहिला जत्था पिंपळनेर वरुन सुरतमार्गे रवाना झाला आहे. संत निरंकारी मंडळाचा 75 वा आंतरराष्ट्रीय “निरंकारी संत समागम” बुधवार, दि. 16 ते 20 नोव्हेंबर दरम्यान समालखा (हरियाणा) येथे सदगुरु माता सुदीक्षा महाराज यांच्या पावन सान्निध्यात साजरा होतो आहे. या संत संमेलनात सहभागी होण्यासाठी संत निरंकारी मंडळाच्या धुळे झोन मधुन हजारो व महाराष्ट्रातून लाखो भाविक रवाना झाले आहेत. मंडळाच्या पिंपळनेर शाखामधील निरंकारी भक्तांचा पहिला जत्था शुक्रवारी, दि.11 सुरत मार्गे रेल्वेने रवाना झाला आहे.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : आंतरराष्ट्रीय "निरंकारी संत समागम"; भक्तांचा पहिला जत्था रवाना appeared first on पुढारी.