पिंपळनेर : विहिरीत आढळला रायपूर येथील युवकाचा मृतदेह

भडगाव www.pudhari.news

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील रायपूर येथील रहिवासी भावडु उत्तम कारंडे (१६ ) हा युवक दुपारी १२ च्या सुमारास मेंढ्या चरण्यासाठी गेला. मात्र, उशिरापर्यंत घरी आला नसल्याने त्याचा शोध घेतला असता भडगाव शिवारातील  जिजाबाई भिवाजी पवार यांच्या विहिरीजवळ भावडुच्या चपला व काठी मिळून आली. त्यामुळे युवकाचा मृतदेह विहिरीत पडल्याची खात्री झाली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीबाहेर काढून जैताणे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून कारंडे यास मृत घोषीत केले. भावडु हा विहिरीवर पाणी पीत असतांना पाय घसरुन पाण्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : विहिरीत आढळला रायपूर येथील युवकाचा मृतदेह appeared first on पुढारी.