पोषक वातावरणामुळे पिंपळनेरला गहू बहरला

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पिंपळनेरसह पश्चिम पट्यातील परिसरात सद्या दिवसभर उन तर रात्रीच्या वेळी अनेकांना हुडहुडी भरविणारी थंडी त्रासदायक ठरत असले तरी शेत शिवारातील रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांसाठी ती पोषक ठरत आहे.

प्रारंभी पेरणी केलेल्या गव्हाच्या पिकांना ओंब्या लागल्याने गव्हाचे पीक चांगलेच बहरले आहे. गेल्या महिन्यात ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मावा, थ्रीप्स, बुरशी रोगांचे अतिक्रमण झाले. यात मोठ्या प्रमाणावर औषधे, कीटकनाशके यांची फवारणी करण्यासाठी शेतकरी वर्गास आर्थिक फटका बसला. यावर्षी गहू व हरभरा या रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. गत काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे हे पीक संकटात सापडले होते. परंतु आता वातावरण निरभ्र झाल्याने गहू पिके बहरली आहेत. त्यात गहू पीक चांगलेच बहरत असून, सद्यःस्थितीत पिकाच्या ओंब्या परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे यंदा या पिकाचे उत्पादन वाढण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. वातावरणात बदल झाल्याने गेल्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढल्याने पिकांना अनुकूल असे वातावरण तयार झाले असून गहू, हरभरा पिकांच्या जोरदार वाढीसाठी व परिपक्व होण्यासाठी लागणारी थंडी सध्या असल्याचे पिके चांगलीच जोमात आली आहे.

बदलत्या वातावरणाने रुग्ण संख्येतही वाढ
सद्या सर्वत्र दिवसभर कडक उन पडत असून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात थंडी पडत असल्याने बदलत्या वातावरणाचा चांगलाच नागरिकांना लहान मुलांना फटका बसत आहे. रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून खाजगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी पहावयास मिळत आहे.

हेही वाचा:

The post पोषक वातावरणामुळे पिंपळनेरला गहू बहरला appeared first on पुढारी.