नाशिक : प्रभू रामांनी सर्वाधिक काळ वास्तव्य केलेल्या नाशिक नगरीतील एक भक्त प्रभू श्री रामांच्या भेटीसाठी नाशिकहून अयोध्येपर्यंत पायी प्रवास करीत निघाला आहे.
महिनाभरापासून हा प्रवास सुरू असून 25 ते 26 जानेवारीपर्यंत प्रभू श्री रामाचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्या नगरीत हा भक्त पोहोचणार आहे. तोंडी श्री रामांचे नामस्मरण करीत हा प्रवास सुरू असून तब्बल दीड हजार कि.मी.चा हा संपूर्ण प्रवास आहे. विरेंद्रसिंग गोपाळसिंग टीळे असे या भक्ताचे नाव आहे. दररोज 35 ते 50 किमी पायी प्रवास करीत आता ते प्रयागराज येथे पोहोचले आहेत.
The post प्रभू रामाच्या भेटीसाठी नाशिकहून अयोध्येपर्यंत पायी प्रवास appeared first on पुढारी.