महिला दिनानिमित्ताने देवळा येथे महिलांना पर्स वाटप

देवळा www.pudhari.news

देवळा ; पुढारी वृत्तसेवा – महाशिवरात्री तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देवळा येथील केदा नाना आहेर व सुभाष रोड गणेश मित्र मंडळाच्या वतीने भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित महिलांना पर्स वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

महाशिवरात्री निमित्ताने देवळा शहरातील मुंजोबा पारावर असलेल्या शिव लिंगच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यानिमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना केदा नाना आहेर व सुभाष रोड गणेश मित्र मंडळाच्या वतीने  खिचडीचे वाटप करण्यात आले. तसेच महिलांना पर्सचे वाटप करून महिला दिन साजरा केला. यावेळी जेष्ठ नगरसेवक जितेंद्र आहेर, गटनेते संभाजी आहेर, भाजपचे तालुका अध्यक्ष व मंडळाचे अध्यक्ष अतुल पवार, माजी उपनगरध्यक्ष अशोक आहेर, तुषार सोनवणे आदी उपस्थित होते. याकामी मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे कौतूक करण्यात आले.

The post महिला दिनानिमित्ताने देवळा येथे महिलांना पर्स वाटप appeared first on पुढारी.