येवला(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– तालुक्यात मंगळवारी( दि. 14) संध्याकाळी झालेल्या वळवाच्या वादळी पावसाने शेतकरी वर्गाची चांगलीच धावपळ झाली. तालुक्यातील साताळी येथील विशाल काळे यांचा गोठा वादळी वाऱ्याच्या प्रकोपामुळे उध्वस्त झाला. तर बापू राजगुरू यांच्या ट्रॅक्टरवर झाड पडल्याने ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. कमी पाऊस मात्र झोरदार वाऱ्याने ठिकठिकाणी नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे.