शर्मा यांच्याकडे आयजी पदाचा अतिरिक्त पदभार

डॉ. बी. जी. शेखर पाटील,www.pudhari.news

नाशिक : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर हे शुक्रवारी (३१ मे) सेवानिवृत्त झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या नाशिक एसआयजी पदाचा अतिरिक्त कार्यभार राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील आर्थिक गुन्हेचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. राज्य महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाने यासंदर्भात आदेश दिले आहेत.