शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत आज शिरवाडे वणीत कुसुमाग्रजांना अभिवादन

कविवर्य कुसुमाग्रज

नाशिक(पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा

नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त व कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आज 27 फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने सुनील पाटील यांनी दिली.

कुसुमाग्रजांच्या गावी म्हणजेच शिरवाडे वणी तालुका निफाड येथे सोमवारी (दि. 26) सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषद मराठी शाळा पालखेड रोड येथे हा कार्यक्रम होणार आहे. शिवसेना प्रदेश सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हास्यजत्राच्या कलाकारांच्या उपस्थितीत कुसुमाग्रजांना अभिवादन केले जाणार आहे. शिरवाडे गावातून ग्रंथदिंडी काढण्यात येऊन उपस्थितांना कुसुमाग्रजांच्या कवितासंग्रहांचे वाटप करण्यात येणार आहे.

The post शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत आज शिरवाडे वणीत कुसुमाग्रजांना अभिवादन appeared first on पुढारी.