श्रमिकनगरला स्वीट्सच्या दुकानात गॅस सिलेंटरने घेतला पेट

सातपूर : येथील श्रमिकनगर मधील गायत्री स्वीट्स या दुकानात गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दुकान मालकाने तात्काळ पेटते सिलेंटर उचलून बाहेर मोकळ्या जागेत आणले. सुरुवातीला पाणी व पोत्याच्या साहाय्याने विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु सिलेंटर काही विझत नव्हते. अखेर दुकानातील कामगाराने अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने पावडर फवरा मारून आग वेळीच आटोक्यात आणली.

सदर स्वीट्स च्या दुकानास वर्षभरापूर्वी देखील शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली होती. यामध्ये पूर्ण दुकान जळून खाक झाले होते. आसपास सर्व परिसर हा व्यावसायिक असल्याने ग्राहकांची नेहमी गर्दी असते. त्यामुळे मोठी दुर्घटना होता होता टळली.

The post श्रमिकनगरला स्वीट्सच्या दुकानात गॅस सिलेंटरने घेतला पेट appeared first on पुढारी.