सिडको : पुढारी वृत्तसेवा – सिडको, अंबड व गोविंदनगर भागात शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने एकच तारांबळ उडाली. तर सिडको, अंबड व गोविंदनगर भागात झाडे रस्त्यावर पडली होती. अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी रस्त्यावर पडलेले झाडे हटवून वाहतुक सुरळीत करून दिली. तर बहुंताश भागात बत्ती गुलचा अनुभव आला. ठीक ठिकाणी तळे साचले होते. शुक्रवारी अक्षय्य तृतीया निमित्त घराबाहेर खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचे अचानक आलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर हाल झाले. दिवसभर उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने समाधान व्यक्त केले.
दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. तसेच, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे ही उन्मळुन पडले. गोविंद नगर या भागातील मुख्य रस्त्यावर झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. तसेच अंबड भागात विखे पाटील शाळेजवळ रस्त्यावर झाड पडले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी रस्त्यावर पडलेले झाड हटवून वाहतुक सुरळीत करून दिली. तसेच दुपार पासुन विज पुरवठा खंडीत झाल्याने व्यापाऱ्याचे व दुकानदारांचे नुकसान झाले. अक्षय्य तृतीया असल्याने नागरिक खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांची तारांबळ उडाली. तसेच हातगाड्या, पदपथांवरील विक्रेत्यांचेही हाल झाले.
हेही वाचा –