गिरीश महाजन यांना माझ्या नावाची कावीळ : एकनाथ खडसे

खडसे-महाजन,www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

गिरीश महाजन यांना माझ्या नावाची कावीळ झाली आहे. गिरीश महाजन यांना दिवस-रात्र फक्त एकनाथ खडसेच दिसतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे.

येत्या दोन ते तीन दिवसांत मंदाकिनी खडसे आणि संबंधित व्यक्तींवर दूध फेडरेशन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल होणार असल्याचे भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले होते. त्यावर खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, “दूध फेडरेशनमध्ये गैरव्यवहार असेल तर मी स्वतः या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. ती तक्रार चोरी करणाऱ्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे त्या कालखंडातले एमडी जे कोणी असतील, पण राजकीय दबावापोटी त्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नाही”, असा दावा खडसेंनी केला.

फेडरेशनचे माजी संचालक महाजन यांच्या जवळचे…

“या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंद झाली नाही. मी रात्रभर त्या ठिकाणी आंदोलन आणि उपोषण केलं. हायकोर्टाच्या माध्यमातून गैरव्यवहार करणाऱ्यांना मी दिलेल्या तक्रारीवरून नोटीसदेखील बजविण्यात आली आहे. एकवेळ तो गुन्हा रजिस्टर झाला तर ही भानगड नेमकी कुणी केली आहे, ते स्पष्ट होईल. या प्रकरणात फेडरेशनचे माजी संचालक जर दोषी असेल तर गिरीश महाजन यांच्या ते अत्यंत जवळचे आहेत असा देखील दावा एकनाथ खडसे यांनी केला.

दूध संघात गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार नाहीच

दूध संघात मधले सहा महिने मोरे काका हे चेअरमन होते. आमच्या मॅडम सात महिने रजेवर होत्या. त्या कालखंडात हा भ्रष्टाचार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुळात तो गैरव्यव्हार किंवा भ्रष्टाचार नाहीच आहे. एखाद वेळेला अनियमितता असेलही, पण जी अनियमितता असेल ती एमडीच्या माध्यमातून झालेली असेल असे खडसे म्हणाले. 

हेही वाचा :

The post गिरीश महाजन यांना माझ्या नावाची कावीळ : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.