‘चला जाणूया नदीला’मध्ये पांझरा नदीचा समावेश करावा ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

निवेदन पांझरा नदी,www.pudhari.news

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘चला जाणूया नदीला’ या अभियानात जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या पांझरा नदीचाही समावेश करावा या मागणीचे निवेदन पांझरा काट बचाव समितीचे अध्यक्ष मोतीलाल पोतदार यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिले.

‘चला जाणूया नदीला’ या अभियानात पांझरा नदीच्या समावेशासाठी प्रयत्न करावा. पांझरा नदीचा गुगल मॅपद्वारे पूर नियंत्रण रेषा सर्व्हे झाला आहे. तो तापी विकास महामंडळाकडे धूळखात पडला आहे. पूर नियंत्रण रेषा आखणीस गती मिळावी. पांझरा नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंत अतिक्रमण होत आहे. चला जाणूया नदीला या अभियानाअंतर्गत भात नदीचा समावेश झाला आहे. त्यानुसार जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेल्या पांझरा नदीचाही समावेश करावा. त्यामुळे पांझरा विकासाला चालना मिळेल. पांझरा नदी बारमाही झाल्यास साक्री, धुळे व शिंदखेडा तालुका सुजलाम् सुफलाम् होईल असे जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पूरनियंत्रण रेषा
पांझरा काठ बचाव समितीच्या पाठपुराव्यातून तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पूर नियंत्रण रेषा आखणीसाठी १९६ लाखाची मंजुरी दिली आहे. याअंतर्गत गुगल मॅपचा सर्व्हे जळगावस्थित तापी विकास महामंडळाकडे धुळखात पडला आहे. त्यावर लवकर योग्य ती कार्यवाही व्हावी. उगमापासून संगमापर्यंतच्या काठावरचे अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवावी अशी मागणी पोतदार यांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

हेही वाचा :

The post 'चला जाणूया नदीला'मध्ये पांझरा नदीचा समावेश करावा ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन appeared first on पुढारी.