जळगावी पोलीस कर्मचार्‍यालाच चाकूच्या धाकावर लुटले

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जळगावात खाकी वर्दी देखील गुन्हेगारीला बळी पडत असल्याची घटना घडली आहे. एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून सोन्याची चैन लांबविल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला पोलिस कर्मचारी आरती मोतीलाल कुमावत (३२) या गुरुवारी (दि.6) रात्री सव्वा नऊच्या सुमारास त्या पोलिस मुख्यालयातील मुख्य परेड ग्राउंडवर पायी फिरत होत्या. यावेळी मैदानावर असलेल्या अंधाराचा फायदा घेत एकाने त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसकावली आणि पळून गेला. या झटापटीत त्या जखमी झाल्या. घटनेची माहिती कळताच पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी केली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post जळगावी पोलीस कर्मचार्‍यालाच चाकूच्या धाकावर लुटले appeared first on पुढारी.