जळगाव : अल्पवयीन मुलीची तस्करी रोखली; संशयित महिलेस अटक

अल्पवयीन मुलीची तस्करी

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा भुसावळ रेल्वे स्थानकावर एका अल्पवयीन मुलीच्या तस्करीचा प्रयत्न आरपीएफ पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांनी हाणून पाडला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील महिलेस अटक केली आहे. तर पीडित मुलीची सुटका करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अप 22537 कुशीनगर एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक बी- 1 मधून एक महिला अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तस्करी करीत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. यानंतर आरपीएफ दलाचे एएसआय प्रेम चौधरी, कॉन्स्टेबल अलीशेर, जे.पी.मीना, लोहमार्गचे हवालदार सुधीर पाटील, समतोल संस्थेचे प्रकाश महाजन यांनी महिलेसह अल्पयीन मुलीला भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडी येताच ताब्यात घेतले.

यानंतर या दोघांना लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले. शबाना (वय 22 पाकरी, जि.बस्ती, उत्तर प्रदेश) असे अटकेतील महिलेचे नाव असून, तिच्या विरोधात मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी लोहमार्गचे पोलीस निरीक्षक विजय खेर्डे यांनी महिलेची सखोल चौकशी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिता फसाटे करीत आहेत.

हेही वाचा : 

The post जळगाव : अल्पवयीन मुलीची तस्करी रोखली; संशयित महिलेस अटक appeared first on पुढारी.