जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांना धक्का, ग्रामपंचायतींवर अपक्षांचा झेंडा

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यावल व चोपडा तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल जाहीर झाला. यात जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींपैकी एकही ग्रामपंचायत भाजपला विजय मिळविता आला नाही. यामुळे मंत्री गिरीश महाजन यांना धक्का मानला जात आहे. याउलट शिवसेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविता आला. तर चार ग्रामपंचायतींवर अपक्षांचा झेंडा राहिला.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्‍यातील ११ व यावल तालुक्‍यातील २ अशा तेरा ग्रामपंचायतींसाठी मतदानाचा प्रक्रीया पार पडली. या सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी काल पार पडली. यात शिवसेना, शिंदे गट व राष्‍ट्रवादीला विजय मिळाला आहे. मात्र, भाजप आणि काँग्रेस पक्षाला भोपळाही फोडता आलेला नाही.

ग्रामपंचायतची पक्षनिहाय निकाल..

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ४ ग्रामपंचायतीवर अपक्षांनी ४ तर शिवसेना ३ आणि शिंदे गटाने ३ ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविला, राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा ३ ग्रामपंचायती काबीज केल्या असून भाजपला मात्र एकही ग्रामपंचायत जिंकता आली नाही, त्यामुळे हा निकाल भाजपसाठी धक्कादायक ठरला आहे.

हेही वाचा :

The post जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांना धक्का, ग्रामपंचायतींवर अपक्षांचा झेंडा appeared first on पुढारी.