जागतिक विधवा महिला दिन : उद्या दिल्लीत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

जागतिक विधवा महिला दिन www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विधवा महिला सन्मान व संरक्षण अभियान महाराष्ट्रच्या वतीने जागतिक विधवा महिला दिनानिमित्त (दि.२३ जून) दिल्ली येथे एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अभियानाचे राज्य निमंत्रक राजू शिरसाठ यांनी दिली.

या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेसाठी विविध राज्यांतून २००, तर महाराष्ट्रातून ५० प्रतिनिधी परिषदेत सहभागी होणार आहेत. अभियानाचे प्रणेते प्रमोद झिंजाडे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, हरियाणा राज्य महिला आयोग अध्यक्ष रेणू भाटिया यांच्यासह विविध राज्यांतील महिला आयोगाच्या अध्यक्षा सहभागी होणार आहेत. परिषदेत प्रामुख्याने देशभरातील विधवा महिलांप्रती असलेल्या रुढी-परंपरांवर ऊहापोह होऊन त्यावर उपाययोजनांचा लेखाजोखा मांडला जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन विधवा महिलांची रुढी-परंपरांच्या जोखडातून सुटका करून त्यांचे आर्थिक, सामाजिक व राजकीय पुनर्वसन करावे यासाठी कार्यनीती आखली जाणार आहे.

हेही वाचा:

The post जागतिक विधवा महिला दिन : उद्या दिल्लीत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन appeared first on पुढारी.